पॉपकॉर्न सारखे दिसणारे वजनाने अतिशय हलके असलेले मखाने आजकाल बऱ्याचजणांच्या डायटमध्ये पाहायला मिळतात. मखाना हे एक प्रकारच्या जलपर्णी वनस्पतीपासुन मिळणारे बी आहे. हे मखाने लो कॅलरी फुड आयटम असल्यामुळे हेल्थ कॉन्शस लोक आपल्या डायटमध्ये याला जास्त पसंती देतात.इतकेच नाही तर याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. चला तर मग आज आपण ते जाणून घेऊयात.
मखान्यांमध्ये शुन्य कॅलरी असते. त्यामुळे हे नियमित खाल्ल्यामुळे वजन नियंत्रणात येते.
मखाने चवीला कमी गोडअसल्यामुळेयाची साखर न टाकता खीर बनवून मधुमेही रुग्णाला खाऊ घातल्यास डायबिटीसमध्ये साखर वाढण्याचे प्रमाण थांबते व त्याचा फायदा देखील मधुमेही रुग्णांना होतो.
सांधेदुखीच्या दुखण्यामध्येदेखील मखाने खाल्ल्यामुळे आराम मिळतो.सांध्यना सुज येणे,सांधे जखडणे, सांध्यांना तीव्र वेदना होणे, वाताचे झटके येणे, सांधे बधिर होणे अशा बऱ्याच समस्यांवर मखाने प्रभावी ठरू शकतात.
किडनीचा त्रास असलेल्या लोकांना देखील मखाने खाल्ल्यामुळे आराम मिळतो. यामुळे किडनीची कार्यक्षमता वाढते.
हृदयरोगासाठी मखाने लाभदायक असतात. यामुळे कोलेस्ट्रॉलचे प्रमाणदेखील घटते. ज्यामुळे हृदयरोग होण्याचा धोका टळतो.
(टीप – वरील सर्व माहिती ही सर्वसाधारण माहितीवर आधारित असून कोणताही उपाय करण्याआधी वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









