Health and Beauty Benefits of Kasoori Methi: जेवणाची चव वाढवण्यासाठी कसुरी मेथीचा वापर प्रत्येक घरात केला जातो.पण याव्यतिरिक्त कसुरी मेथी मध्ये असे अनेक घटक आहेत जे त्वचा आणि केसांशी संबंधित समस्या दूर करण्यास मदत करतात .चला तर मग कसुरी मेथीचा दररोज आहारात समावेश केल्याने कोणते आश्चर्यकारक फायदे मिळतात ते जाणून घेऊया.
कसुरी मेथीचे नियमित सेवन केल्याने पोटाशी संबंधित अनेक समस्या जसे की बद्धकोष्ठता, जुलाब,अपचन आणि वेदनांपासून आराम मिळतो. इतकंच नाही तर कसुरी मेथीमध्ये असलेले अँटी-इंफ्लामेटरी आणि व्हिटॅमिन-सी सारखे गुणधर्म पोटाची एलर्जी कमी करतात.
कसुरी मेथीमध्ये असलेले व्हिटॅमिन-सी आणि लोह त्वचेला संसर्गापासून वाचवते. इतकेच नाही तर ते त्या बॅक्टेरियाचा नाश करण्यासही मदत करते, ज्यामुळे डार्क सर्कल्स, पिंपल्स आणि मुरुमांची समस्या निर्माण होते.
केसांसाठीही कसुरी मेथी खूप फायदेशीर आहे. त्यात लोह आणि कार्बोहायड्रेट असते जे केसांना मुळापासून मजबूत करते आणि टाळूची खाज कमी करते.
कसुरी मेथी एथेरोस्क्लेरोसिस कमी करण्यास देखील मदत करते. लिपिड फ्लकच्युएशनने ग्रस्त असलेल्या रुग्णांना या औषधी वनस्पतीचा खूप फायदा होतो. हे कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते.
(टीप : वरील माहिती ही सर्वसामान्य माहितीवर आधारित असून कोणताही उपाय करण्याआधी वैद्यकीय किंवा सौंदर्य तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









