उचगाव/वार्ताहर
गांधीनगर ता. करवीर येथे शिरू चौक येथे रागाने एकमेकाकडे पाहिलेच्या कारणावरून शिवागीळ करून लाथाबुक्क्यांनी मारून एका अल्पवयीन मुलाने लहान चाकूने पाठीत व डाव्या पायाच्या गुडघ्याजवळ भोसकून तरुणास जखमी केल्याची घटना शुक्रवारी रात्री उशिरा घडली.
अमोल विजय कुंभार वय २६ मूळ रा.हालोंडी ता. हातकणंगले सध्या राहणार चिंचवाड तालुका करवीर असे जखमी झालेल्या तरूणाचे नाव आहे.याबाबत अमोल कुंभार यांनी गांधीनगर पोलिसांत फिर्याद दिली.
अमोल कुंभार हा शिरू चौक गांधीनगर येथे मेडिकल मध्ये गोळी घेण्यासाठी गेला असता इसीका लेडीज टेलर दुकानासमोर अल्पवयीन संशयिताने त्याच्याकडे रागाने पाहिलेच्या कारणावरून कुंभार यांना शिवागीळ करून फिर्यादीची गळपट धरून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. याचवेळी पॅंटेच्या खिशातून चाकू काढून कुंभार यांच्या पाठीत व डाव्या पायाच्या गुडघ्याजवळ मारून जखमी केले व त्यास धमकी दिली. या प्रकरणी गांधीनगर पोलिसांत गुन्हा नोंद झाला असून अधिक तपास पोलीस नाईक कांबळे करीत आहेत.









