मिरज :
खाजा वस्ती या ठिकाणी दोन कुटुंबात झालेल्या किरकोळ वादातून दोघांवर चाकू आणि कुऱ्हाडीने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे यामध्ये अब्दुल जातकर आणि जावेद जातकर हे गंभीर जखमी झाले आहेत.
काही दिवसांपूर्वी अब्दुल जातकर यांची बैलगाडी यांच्या शेजारीच राहणारे इकबाल मुजावर यांच्या मोटरसायकलला घासल्याच्या वाद झाला होता आज दोन्ही कुटुंबातील महिलांमध्ये किरकोळ वाद झाला याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. दोन्ही कुटुंब महात्मा गांधी पोलीस ठाणे येथे तक्रार देण्यासाठी येत असताना हॉटेल सन्मान समोर जोरदार वादावादीचा प्रकार घडला इकबाल मुजावर व इतर तिघांनी अब्दुल जातकर आणि जावेद जातकर यांच्यावर चाकू आणि कुराड या हत्याराने हल्ला करून गंभीर जखमी केले आहे.
घटनेची माहिती महात्मा गांधी पोलीस ठाणे येथे मिळाल्यानंतर सपोनि संदीप शिंदे तसेच त्यांच्या डीबी पथकाने घटनास्थळी धाव घेतली तात्काळ हल्लेखोरांची धरपकड सुरू केली यावेळी एकाला तात्काळ पोलिसांनी ताब्यात घेतले.








