ऑनलाईन टीम/तरुण भारत
राज्यात शिंदे गटाने केलेल्या बंडखोरीनंतर सत्तांतर झाले. यानंतर मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) तर उपमुख्यमंत्री पदी देवेंद्र फडणवीस (Dy CM Devendra Fadnavis) विराजमान झाले. सत्तांतरावेळी अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. महाराष्ट्र-सुरत-गुवाहाटी नंतर गोवा असा प्रवास करत हे बंखोडर आमदार परत महाराष्ट्रात आले होते. तेव्हा शिंदे गटातून परतलेले आमदार नितीन देशमुख (Nitin Deshmukh) यांनी आता मोठं वक्तव्य करत शिंदे -फडणवीस सरकारला इशारा दिला आहे. राज्यात पैशांच्या मदतीने सत्तांतर झालं असल्याचा आरोप त्यांनी केलाय. तसंच हे मी सिद्ध करू शकलो नाही तर राज्याच्या विधानसभेत आत्महत्या करेन असंही त्यांनी म्हटलंय.
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड करत ४० आमदारांना घेऊन भाजपबरोबर सत्ता स्थापन केली. सत्तांतरानंतर मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे तर उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस सत्तेचा रथ हाकत आहेत. दरम्यान, महाराष्ट्र-सुरत-गुवाहाटी नंतर गोवा असा प्रवास करत हे बंखोडर आमदार परत महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्याकडे परतले आमदार नितीन राऊत यांनी राज्यातील सत्तांतरावर मोठे विधान केले आहे. राज्यात पैशांच्या मदतीने सत्तांतर झाले असून मी ते सिद्ध करू शकलो नाही, तर महाराष्ट्राच्या विधानसभेत आत्महत्या करेन, असे नितीन देशमुख म्हणाले आहेत. ते रविवारी (१८ सप्टेंबर) अकोला जिल्ह्यात एका सभेला संबोधित करत होते. एका वृत्तवाहिनेनं याबाबतचे वृत्त दिले आहे.
हे ही वाचा : अस्तित्व नसल्यानेच काँग्रेसचा प्रत्येक गोष्टीला विरोध
राज्यातील सत्तांतराच्या प्रत्येक क्षणाचा मी साक्षीदार आहे. महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठीचं हे गेल्या दीड वर्षांपासून षडयंत्र सुरू होतं. हे आताचं षडयंत्र नव्हतं. माझ्यावर त्यांनी पुन्हा चुकीची कारवाई केली तर मी माझ्याकडील क्लीप बाहेर काढणार. महाराष्ट्रात त्यांनी सत्तांतर घडवले. शिवसेनेच्या पाठीत ज्यांनी खंजीर खुपसला त्यांच्या क्लीप्स माझ्याकडे आहेत असेही नितीन देशमुख यांनी सांगितले.
उद्धव ठाकरे भेटत नसल्याची तक्रार करतात. बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आम्हाला वाचवायची होती. त्यांचे विचार आम्हाला वाचवायचे होते असं काही नेते सांगतात. पण त्यांच्या आवाजाची क्लिप बाहेर काढली तर सत्य समोर येईल. राज्यात पैसे घेऊन सत्तांतर झालंय, हे सिद्ध करू शकलो नाही तर विधानसभेत आत्महत्या केल्याशिवाय राहणार नाही, असं नितीन देशमुख यांनी म्हटलं.