कोल्हापूर : खालावलेली अर्थिक स्थितीमुळे कमी उत्पन्नाच्या मार्गावरिल बससेवा बंद करण्याच्या कोल्हापूर शहर हद्दवाढ कृती समितीची मागणीमुळे मुडशिंगी व चुये-येवती मार्गावरील केएमटी बस सेवा बंद करण्यात आली आहे.
कोल्हापूर महानगरपालिकेने जारी केलेल्या एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे कि, “केएमटी उपक्रमाची आर्थिक परिस्थिती खालावलेली आहे. कर्मचाऱ्यांचे वेतनामध्ये महागाई भत्ता व घरभाडे भत्त्याचा समावेश करणेत आला आहे. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची देणी प्राधान्याने देणे क्रमप्राप्त आहे. त्यामुळे ज्या मार्गावर कमी उत्पन्न प्राप्त होत आहे, अशा मार्गावरील बस सेवा टप्प्याटप्प्याने बंद कराव्या लागणार आहेत. कमी उत्पन्नाच्या मार्गावरील बस सेवा बंद करणेबाबत कोल्हापूर शहर हद्दवाढ कृती समितीची मागणी होत होती. यापुर्वी कुडित्रे, म्हारुळ व बहिरेश्वर या मागा्रवरील बस सेवा बंद करणेत आलेली आहे. त्या व्यतिरिक्त मुडशिंगी व चुये-येवती या मार्गावरील बस सेवेपासून अपेक्षित उत्पन्नापेक्षा अत्यंत कमी उत्पन्न प्राप्त होत असलेने मुडशिंगी व चुये-येवती या मार्गावरील बस सेवा तात्पुरत्या स्वरुपात बंद करुन भविष्यात आर्थिक परिस्थितीत सुधारणा झालेस सदर मार्ग चालू करणेबाबत निर्णय घेणेत येईल.” असे म्हटले आहे. त्यामुळे मुडशिंगी व चुये-येवती या मार्गावरील उत्पन्न कमी असल्याने दि.13/09/2022 पासून या मार्गावरिल बससेवा बंद करणेत येत असल्याचे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
Previous Articleसत्ता ओरबाडून घेतली, मात्र कामाचा अजून पत्ता नाही
Next Article पायांचे टॅनिंग घालवण्यासाठी घरगुती उपाय









