बेळगाव : भाग्यनगर येथील येथील केएलएस शाळेच्या वार्षिक क्रीडा स्पर्धेला मोठ्या उत्साहात झाल्या. स्पर्धेच्या उद्घाटनाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध फिजिओथेरपीस्ट डॉ. अमित पिंगट, मुख्याध्यापिका नंदिनी मुतालिक-देसाई, सारिका नाईक, गोगटे महाविद्यालयाचे क्रीडा निर्देशक मंजुनाथ गौडा, नर्मदा अंतलमरद आदी व्यासपीठावर उपस्थित होते. प्रारंभी पाहुण्यांचे हस्ते क्रीडाध्वजारोहण करण्यात आले. ग्रीन, रेड, यलो व ब्युल्यू गटाच्या संघांनी पथसंचलन करुन पाहुण्यांना मानवंदना दिली. विद्यार्थ्यांनी वैष्णवी वादीराज, समर्थ कुलकर्णी, अनुप हनगोजी व कावेरी पारिश्वाड यांनी क्रीडाज्योत मैदानाभोवती फिरून पाहुण्यांच्याकडे सुपूर्द केली.
मुगदा गोडसे हिने सर्वांना शपथ देवविली. पाहुण्यांचा परिचय बेळगावकरने करुन दिला. शालेय जीवनातील खेळाचे महत्व व खेळाडूंनी अभ्यासाबरोबर खेळामध्ये प्राविण्य दाखविल्यास यश संपादन करता येते. त्यासाठी विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबर खेळही खेळले पाहिजेत, तरच आपले शरीर सुदृढ बनते. यावेळी उत्कृष्ट पथसंचलन केलेल्या गटांना बक्षीस देवून गौरविण्यात आले. ब्युल्यू हाऊसने प्रथम, रेड द्वितीय, ग्रीन तृतिय तर यलो गटाला चौथा क्रमांक पटकाविला. त्यानंतर विविध स्पर्धांना प्रारंभ करण्यात आला. यावेळी पालकांसाठी विविध खेळांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये पालकांनी सहभाग घेतला. क्रीडाशिक्षक उमेश मजुकर, कौशीक पाटील, यशोदा हादमनी यांच्या मार्गदर्शना खाली स्पर्धांना प्रारंभ झाल्या. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी शिक्षकवर्गाने विशेष परिश्रम घेतले.









