टिळकवाडी विभागीयस्तरीय फुटबॉल स्पर्धा
बेळगाव : सार्वजनिक शिक्षण खात्यातर्फे घेण्यात आलेल्या रजपूत बंधू स्कूल आयोजित टिळकवाडी विभागीयस्तरीय माध्यमिक फूटबॉल स्पर्धेत केएलएस, एम. व्ही. हेरवाडकर, संतमीरा व ओरिएंटल स्कूलनी आपल्या प्रतिस्पर्धांवर मात करून उपांत्यफेरीत प्रवेश केला आहे. सुभाष चंद्रबोस लेले मैदानावर या स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी सकाळी स्पर्धेचे प्रमुख पाहुणे कर्नाटक राज्य फुटबॉल संघटनेचे नूतनउपाध्यक्ष अमित पाटील अस्मिता इंटरप्राईजेचे संचालक व दडपण फिल्मचे निर्माते राजेश लोहार, अभिनेत्री राधिका, संतोष सुतार, अशोक अण्णीगेरी, गोपाळ खांडे, जयसिंग धनाजी, पी. एस. कुरबेट, प्रवीण पाटील, रामलिंग परीट, अर्जुन भेकणे, विजय रेडेकर या मान्यवरांच्या हस्ते खेळाडूंची ओळख व नाणेफेक करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी क्रीडाशिक्षक किरण तरळेकर, विठ्ठल, संतोष दळवी, प्रवीण पाटील. आदी उपस्थित होते. पहिल्या सामन्यात गोमटेश हायस्कूलनने व्ही. एम. शानभाग शाळेचा 2-0 असा पराभव केला. दुसऱ्या सामन्यात ओरिएंटल शाळेने एम. आर. भंडारी शाळेचा 2-0 पराभव केला. तिसऱ्या सामन्यात जी. जी. चिटणीस शाळेने प्रेसेशियस ब्लाजम शाळेचा 1-0 असा पराभव केला. चौथ्या सामन्यात मुक्तांगण शाळेने सरकारी माध्यमिक झेल शाळेचा 4-0 असा पराभव केला पाचव्या सामन्यात ओरिएंटल शाळेने भारतीविद्याभवन शाळेचा 2-0 सहाव्या संत मीरा शाळेने जी. जी. चिटणीस शाळेचा 1-0 असा पराभव केला. सातव्या एम. व्ही. हेरवाडकरने गोमटेश शाळेचा 3-0 तर आठव्या सामन्यात केएलएस शाळेने मुक्तांगण शाळेचा सडनडेथवर 9-8 असा पराभव केला. हेरवाडकर, केएलएस, संतमीरा, ओरिएंटल संघाने उपांत्यफेरीत प्रवेश केला आहे.









