फिनिक्स चषक क्रिकेट स्पर्धा
बेळगाव : फिनिक्स स्कूल आयोजित फिनिक्स चषक 16 वर्षाखालील आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत केएलएसने केएलईचा, केव्हीटूने फिनिक्सचा, ज्ञान प्रबोधनने भरतेशचा पराभव करून पुढील फेरीत प्रवेश केला. सोहम पाटील, पार्थ उचगावकर यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला. होनगा येथील फिनिक्स स्कूलच्या मैदानावरती खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात केएलईने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात सर्व गडीबाद 94 धावा केल्या. त्यात ओंम जकातीने 22 तर आरूशने 18 धावा केल्या. केएलएसतर्फे सिध्दार्थ रायकरने 9 धावात 4, सोहम पाटील व तेजस यांनी प्रत्येकी 2 गडीबाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना केएलएसने 20 षटकात 9 गडीबाद 94 धावाच केल्या. त्यामुळे सामना बरोबरीत राहिला. त्यात ऋषीकेश बंगोडीने 21, सोहम पाटीलने 16 धावा केल्या.
केएलईतर्फे सय्यद व कलश बेनेकट्टी व ओंम जकाती यांनी प्रत्येकी 2 गडीबाद केल्या. सामना बरोबरीत झाल्याने पंचानी सुपर ओव्हरचा सामना खेळविला. केएलएसने 6 चेंडूत 1 गडीबाद 6 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना केएलईने 6 चेंडूत 2 गडीबाद 4 धावाच केल्या. त्यामुळे हा सामना केएलएसने 2 धावांनी जिंकला. दुसऱ्या समान्यात फिनिक्स संघाने प्रथम फलंदाजी करताना 14. 2 षटकात सर्व गडीबाद 74 धावा केल्या. त्यात इस्माईलने 10 धावा केल्या. केव्हीटूतर्फे मुतगीने 4 गडीबाद केल्या. प्रत्युतरादाखल खेळताना केव्हीटुने 9.2 षटकात 2 गडीबाद 75 धावा करून सामना 8 गड्यांनी जिंकला त्यात आर्याने 22 तर गौतमने 13 धावा केल्या. तिसऱ्या सामान्यात ज्ञान प्रबोधनने 20 षटकात 7 गडीबाद 149 धावा केल्या. तर पार्थ उचगाकरने 45 धावा केल्या. तर देवने 24 धावा केल्या. प्रत्युतरादाखल खेळताना भरतेशने 20 षटकात 6 गडीबाद 126 धावाच केल्या. त्यात गणेशने 19 व सुमीतने 15 धावा केल्या. ज्ञान प्रबोधनतर्फे रोहित कुमठेने 2 तर आयुष 1 गडीबाद केला.









