प्रतिनिधी/ बेळगाव
केएलई संस्थेच्या डॉ. संपतकुमार एस. शिवणगी कॅन्सर रुग्णालयाचे उद्घाटन सोमवार दि. 30 डिसेंबरऐवजी शुक्रवार दि. 3 जानेवारी 2025 रोजी होणार आहे. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्या निधनामुळे कॅन्सर रुग्णालय उद्घाटन कार्यक्रम 3 जानेवारीपर्यंत लांबणीवर टाकण्यात आल्याची माहिती केएलई संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे यांनी एका पत्रकाद्वारे दिली आहे.

3 जानेवारी रोजी दुपारी 4 वाजता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते उद्घा टन होईल. उद्घाटन समारंभाच्या निमंत्रण पत्रिका यापूर्वीच मान्यवरांना पाठविण्यात आल्या आहेत. निमंत्रण पत्रिकेत प्रवेश पत्राचाही समावेश आहे. शुक्रवार दि. 3 जानेवारी रोजी रुग्णालयाचे उद्घाटन असल्याची नोंद घेऊन समारंभाला उपस्थित राहावे. पाण्याची बॉटल, कॅरिबॅग, छत्री, मोबाईल फोन यासारख्या वस्तू समारंभ स्थळावर आणू नयेत. सुरक्षिततेच्यादृष्टीने निमंत्रितांनी दुपारी 3 पूर्वी समारंभ स्थळावर उपस्थित राहावे, असेही डॉ. कोरे यांनी कळविले आहे.









