बेळगाव : केएलई तांत्रिक महाविद्यालय आयोजित निमंत्रितांच्या फुटबॉल स्पर्धेत गोगटे, केएलई इंजिनिअरींग, एसजीबीआयटी, अंगडी, गोगटे पीयुसी संघांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करुन विजयी सलामी दिली. केएलई इंजिनिअरींग महाविद्यालयाच्या मैदानावरती आयोजित या स्पर्धेच्या उद्घटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य डॉ. एस. एफ. पाटील, डीन गिरीधर हेब्बाळे, क्रीडा निर्देशक सुरज धामणेकर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते चेंडू लाथाडून व खेळाडूंची ओळख करुन स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटन सामन्यात गोगटे महाविद्यालयाने केएलई फार्मा संघाचा 3-0 असा पराभव केला. या सामन्यात गोगटेच्या अनिकेत मानेने 2 तर मयुर पी.ने 1 गोल केला.
दुसऱ्या सामन्यात केएलई इंजिनिअरींग अ ने एसजीबीआयटी ब संघाचा 1-0 असा पराभव केला. केएलईतर्फे कृणालने एकमेव गोल केला. तिसऱ्या सामन्यात एसजीबीआयटी ब ने आरएलएसचा 2-1 असा पराभव केला. एसजीबीआयटीतर्फे सादीकने 2 तर मंगेशकरने 1 गोल केला. आरएलएसतर्फे ओमकार अप्पुगोळने 1 गोल केला. तिसऱ्या सामन्यात जैन संघाला वसंतराव पोतदार संघाने 2-1 असा पराभव केला. जैनतर्फे साकीब व यश यांनी केला नोंदविले तर व्हीपीतर्फे ओम हर्षेकरने 1 गोल केला. चौथ्या सामन्यात अंगडी संघाने सेंटपॉल संघाचा 2-0 असा पराभव केला. अंगडीतर्फे ओम व मेघन यांनी प्रत्येकी 1 गोल केला. पाचव्या सामन्यात गोगटे पियुने जीएसएस संघाचा 2-1 असा पराभव केला. गोगटेतर्फे कृष्णा के. व अथर्व बी. यांनी प्रत्येकी 1 तर जीएसएसतर्फे साईने एकमेव गोल केला.









