बेळगाव : जीआयटी तांत्रिक महाविद्यालय आयोजित व्हीटीयू चषक बेळगाव विभागीय आंतरमहाविद्यालयीन क्रिकेट स्पर्धेत रविवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात जैन ,जीआयटी , केएलई हुबळी, संघ पुढील फेरीत प्रवेश केला. व्हीटीयू मैदानावर खेळविण्यात आलेल्या सामन्यात केएलई हुबळीने प्रथम फलंदाजी करताना 19.5 षटकात सर्व गडी बाद 123 धावा केल्या. त्यात रक्षीतने 34, वीरनगौडाने 30 धावा केल्या. केएलएस हल्याळतर्फे शिवयोगीने 3 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना केएलइस हल्याळचा डाव 12.4 षटकात 52 धावात आटोपला. त्यात माहिनने 16 तर हेमंतने 14 धावा केल्या. केएलईतर्फे विशाल मेळवणकीने 16 धावात 4गडी बाद केले. दुसऱ्या सामन्यात जैन बेळगावने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 7 गडी बाद 183 धावा केल्या. त्यात जिनत एबीएमने 95, प्रेमने 39 धावा केल्या. निपाणीतर्फे सिद्धार्थने 3 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना व्हीएसएम निपाणीचा डाव 19.5 षटकात 123 धावात आटोपला. त्यात प्रथमेशने 32 तर प्रज्वलने 30 धावा केल्या. जैनतर्फे जिनतने 3 गडी बाद केला.
जीआयटी मैदानावर खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात केएलएस जीआयटीने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 9 गडी बाद 172 धावा केल्या. तर पीयुष पताडेने 60, श्रेयस नेतलकरने 40 तर झियान पिरझादेने 20 धावा केल्या. जैनतर्फे तेजस चव्हाणने 38 धावात 3 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना जैननचा डाव 16 षटकात 100 धावात आटोपला. त्यात अनिल बी. ने 21, ओमकारने 20, युवराजने 18 तर अय्यदने 14 धावा केल्या. जीआयटीतर्फे अविचल अमनगीने व ओझस राजमाने यांनी प्रत्येकी 3 गडी बाद केले. दुसऱ्या सामन्यात जैन हुबळीने प्रथम फलंदाजी करताना 19.5 षटकात सर्व गडी बाद 194 धावा केल्या. त्यात मदनकुमारने 52, विकास ए. ने 32, अफताबने 23 तर अर्बाजने 19 धावा केल्या. निडसोशीतर्फे सोमेश्वर मदियाळने 3, सौरव व पृथ्वीराज यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना हिरासुगर निडसोशीने 20 षटकात सर्व गडी बाद 123 धावात आटोपला. त्यात युसूबने 21, श्रीधर व अथर्व यांनी प्रत्येकी 14 तर सोमेश्वरने 13 धावा केल्या. हुबळीतर्फे मदनकुमार, विनायक व अमीर यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.









