हनुमान चषक 14 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धा
बेळगाव : बेळगाव स्पोर्ट्स क्लब आयोजित पाचव्या हनुमान चषक 14 वर्षाखालील आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत उद्घाटन दिवशी केलई इंटरनॅशनल अ संघाने महिला विद्यालयचा, तर केएलई ब ने गजाननराव भातखांडे संघाचा पराभव करून विजयी सलामी दिली. मोहम्मद हमजा, विख्यात यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला. प्लॅटीनियम क्रिकेट मैदानावर आयोजित स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून एसकेई सोसायटीचे प्लॅटीनियम मैदानाचे चेअरमन आनंद सराफ, पुरस्कृर्ते आनंद सोमण्णचे, प्रा. अरविंद हलगेकर, डॉ. रामकृष्ण एन., प्रशांत मनकाळे, आनंद रत्नाप्पा गोळ, विवेक पाटील, बळकृष्ण फाटील, प्रसाद नाकाडी आदी मान्यवर उपस्थित होते. पाहुण्यांच्या हस्ते यष्टीचे पुजन करून उदघाटन करण्यात आले. उद्घाटनाच्या सामन्यात केलई इंटरनॅशनलने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 8 गडीबाद 139 धावा केला. त्यात शिवम खोतने 3 चौकारांसह 37, यशने 22, महमद हमजाने 19 तर संस्कृतने 12 धावा केल्या.
महिला विद्यालय तर्फे अथर्व बी.ने 24 धावात 3, रजत व कृष्णा यानी प्रत्येकी दोन गडी बाद केले. प्रत्युत्तरदाखल खेळताना महिला विद्यालयाने 20 षटकात आठ गडी बाद 49 आवाच केल्या. त्यात निधी पाटीलने 18 धावा केल्या. केएलई तर्फे मोहम्मद हमजाने पाच धावात 3, अंशुमनने दोन, तर तर अब्रार व संस्कृत यांनी एक गडी बाद केला. दुसऱ्या सामन्यात गजाननराव भातखांडे संघाने प्रथम फलंदाजी करताना 15.4 षटकात सर्व गडीबात 81 धावा केल्या. त्यात औदुंबरने 6 चौकारांसह 41 धावा केल्या. केएलई ब तर्फे विख्यातने 24 धावा 4, प्रभवीर रावने 3, दिव्यांशूने दोन, गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना केएलई ब ने 10 षटकात बिन बाद 82 धावा करून सामना दहा गड्यांनी जिंकला. मंगळवारचे सामने: केएलएस वि. मराठा मंडळ. सकाळी 9 वा. ज्ञान प्रबोधिनी विरुद्ध केंद्रीय विद्यालय-2 यांच्यात दुपारी 1.30 वा.









