वृत्तसंस्था/नवी दिल्ली
आयपीएलच्या आज रविवारी येथे होणाऱ्या एका बिनमहत्त्वाच्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स त्यांच्याप्रमाणे स्पर्धेतून बाहेर पडलेल्या सनरायझर्स हैदराबादविऊद्ध खेळतील. या सामन्यात दोन्ही संघाच्या दृष्टीने प्रेरणा मिळावी अशा बाबी कमीच असतील.विडंबना म्हणजे केकेआर व हैदराबाद हे 2024 च्या आयपीएलमधील त्यांचा शेवटचा सामना खेळले होते तेव्हा तो अंतिम सामना होता. त्यात श्रेयस अय्यरच्या संघाने पॅट कमिन्सच्या संघाला एकतर्फी सामन्यात पराभूत केले होते. तथापि रविवारी दोन्ही संघांसमोर फक्त उरलीसुरली प्रतिष्ठा वाचविण्याचे आव्हान असेल आणि जास्तीत जास्त ते सहाव्या स्थानावर पोहोचतील. ‘आरसीबी’ला शुक्रवारी रात्री 42 धावांनी हरविलेले असल्याने हैदराबादचे पारडे या सामन्यात जड राहील आणि केकेआरपेक्षा ते सामन्यासाठी जास्त सज्ज असतील. कारण केकेआर आपला शेवटचा सामना 7 मे रोजी ईडन गार्डन्सवर चेन्नईविरुद्ध खेळला होता.
पॅट कमिन्सची या हंगामाचा शेवट विजयी पद्धतीने करण्याची इच्छा असेल आणि ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, इशान किशन, अनिकेत वर्मा यांचा समावेश असलेली त्यांची भक्कम फलंदाजी कोटला येथील फलंदाजांसाठी नंदनवन असलेल्या खेळपट्टीचा मोठा लाभ उठवू शकते. अजिंक्य रहाणेच्या संघाचा 17 मे रोजी आरसीबीशी सामना होणार होता. आयपीएल पुन्हा सुरू झाल्यानंतरचा त्यांचा हा पहिला सामना होता. परंतु बेंगळूरच्या हवामानाने केवळ सामन्यावर पाणी टाकले नाही, तर त्यांच्या प्ले-ऑफच्या आशाही संपुष्टात आणल्या.
प्ले-ऑफमधील चार जागा आधीच निश्चित झाल्यामुळे आजचा सामना हा एक औपचारिकता आहे. परंतु म्हणून दोन्ही संघ विजयाने मोहिमेचा शेवट करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यापासून मागे राहणार नाहीत. केकेआरसाठी स्थानिक क्युरेटर सुजन मुखर्जी यांनी तयार केलेली खेळपट्टी मदतकारी ठरलेली नाही. त्यांनी घरच्या मैदानावर महत्त्वाचे सामने गमावले आणि आंतरराष्ट्रीय हंगामात शानदार कामगिरी केल्यानंतर त्यांचा मुख्य गोलंदाज वऊण चक्रवर्ती त्याच्या कीर्तीला जागू शकला नाही. केकेआरसाठी वेंकटेश अय्यरला 23.75 कोटी रुपये देऊन परत बोलावणे अंगलट आलेले आहे. त्याला 11 सामन्यांत फक्त 142 धावा काढता आल्या आहेत. शिवाय तो आता गोलंदाजीही करत नाही.
कर्णधार रहाणे हा त्याच्या टी-20 कौशल्यासाठी ओळखला जात नाही. पण तो या स्पर्धेत 375 धावांसह त्यांचा सर्वोत्तम फलंदाज ठरला आहे. तो मोठ्या फटक्यांसाठी ओळखला जात नाही, पण त्याने स्पर्धेत आतापर्यंत 20 षटकार खेचले आहेत, जे त्याच्या संघाचा विचार करता सर्वाधिक आहेत. आंद्रे रसेल आणि रिंकू सिंग यांना 16 व्या ते 20 व्या षटकांच्या दरम्यान सातत्याने मोठी फटकेबाजी करण्यात आलेले अपयशही त्यांना महागात पडलेले आहे.
संघ
कोलकाता नाईट रायडर्स : अजिंक्य रहाणे (कर्णधार), मनीष पांडे, अंगक्रिश रघुवंशी, रिंकू सिंग, लुवनीथ सिसोदिया, क्विंटन डी कॉक, रहमानउल्ला गुरबाज, सुनील नरेन, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, अनुकुल रॉय, व्यंकटेश अय्यर, वऊण चक्रवर्ती, हर्षित राणा, वैभव अरोरा, मयंक मार्कंडे, उमरान मलिक, एनरिक नॉर्टजे, स्पेन्सर जॉन्सन.
सनरायझर्स हैदराबाद : पॅट कमिन्स (कर्णधार), इशान किशन, अथर्व तायडे, अभिनव मनोहर, अनिकेत वर्मा, सचिन बेबी, स्मरण रविचंद्रन, हेनरिक क्लासेन, ट्रॅव्हिस हेड, हर्षल पटेल, कामिंदू मेंडिस, वियान मुल्डर, अभिषेक शर्मा, नितीश कुमार रे•ाr, मोहम्मद शमी, राहुल चहर, सिमरजित सिंग, झीशान अन्सारी, जयदेव उनाडकट, एशान मलिंगा.
सामन्याची वेळ : संध्याकाळी 7:30 वा.









