तरुणभारत ऑनलाइन टीम
बॉलिवूड गायक केकेच्या निधनामुळे संपूर्ण म्युझिक इंडस्ट्री वर शोककळा पसरली आहे. वयाच्या 53 व्या वर्षी केकेचं कोलकाता येथे लाइव्ह कॉन्सर्टनंतर निधन झाले. त्याच्या निधनानंतर त्यांच्या लाईव्ह कॉन्सर्ट दरम्यानचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत.त्यातील एका व्हिडीओ मध्ये त्याने बोललेलं वाक्य ऐकून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.
व्हिडिओमध्ये केके ‘आंखों में तेरी’ हे रोमँटिक गाणे गाताना दिसत आहेत. गाताना ते प्रेक्षकांमध्ये बसलेल्या मुलींकडे माईक फिरवतात आणि त्यांना गाणे म्हणायला सांगतात. त्यानंतर ते गमतीने ‘हाय, मैं मर जाऊं यहीं पे.’ असे म्हणतात. पण कुणाला माहित होत की, त्यांनी गमतीने म्हटलेले त्याच रात्री खरे ठरेल. त्यांच्या अकाली निधनाने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.केके यांच्या निधनानंतर पराते चाहत्याच्या सोशल मीडियावर केके ने गायलेली गाणी झळकत आहेत.









