ऑनलाईन टीम/तरुण भारत :
वयाच्या ५३ व्या वर्षापर्यंत आपल्या अनोख्या आवाजाने हिंदी-बांगलासह अनेक भाषांमध्ये आपली जादू पसरणाऱ्या प्रसिद्ध गायक केके यांनी हिंदीसोबतचतमिळ, तेलगू, कन्नड, मल्याळम, मराठी, बंगाली, आसामी आणि गुजराती भाषेतील चित्रपटात ही आपला ठसा उमटवला. केके यांनी कोणकोणती उपलब्धी प्राप्त केली ते आपण पाहणार आहोत.
23 ऑगस्ट 1968 रोजी दिल्लीमध्ये केके यांचा जन्म झाला. केके यांचे पूर्ण नाव कृष्णकुमार कुननाथ होते. केकेने हिंदीसोबतच तमिळ, तेलुगु, कन्नड, मल्याळम, मराठी, बंगाली, आसामी आणि गुजराती भाषेतील चित्रपटातील गाणी गावून संपूर्ण भारतातील प्रेक्षकांना मोहित केले. दिल्लीत जरी जन्म घेतला असला तरी केकेचे कामाचे ठिकाण मुंबई हेच राहिले.
केकेच्या लोकप्रिय गाण्यांबद्दल बोलायचे झाले तर ‘यारों दोस्ती बडी ही ‘ हे स्वतःच्या अल्बम मधील गाणे खूप गाजले होते. सलमान खान, अजय देवगण आणि ऐश्वर्या राय यांच्या हम दिल दे चुके सनम मधील मधील ‘तडप-तडप के इस दिल से’ गाणे, बचना ए हसीनो मधील ‘खुदा जाने’, ‘काइट्स’मधील ‘जिंदगी दो पल की’, ‘जन्नत ‘मधील ‘जरा’. , गँगस्टरचे गाणे ‘तू ही मेरी शब है’, गाणी प्रचंड गाजली.
1994 मध्ये मुंबईत बॉलीवूडमध्ये प्रवेश आणि पहिला ब्रेक मिळाला
केके त्यांच्या लग्नानंतर सुमारे तीन वर्षांनी 1994 मध्ये, मुंबई येथे राहायला गेले. आपल्या स्वप्नाच्या शोधात मुंबईत आलेल्या केकेला 1994 मध्ये यूटीव्ही जाहिरातीतून पहिला ब्रेक मिळाला आणि त्यानंतर कृष्णकुमार कुननाथचा बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक बनण्याचा प्रवास सुरू झाला. माचीस चित्रपटातील ‘छोड आये हम’ या गाण्याने केकेची बॉलीवूडमध्ये प्रवेश झाला. आपल्याला मिळालेल्या या संधीचे केकी यांनी सोने केले. केकेने मागे वळून पाहिले नाही आणि एकापाठोपाठ एक सुपरहिट गाणी देत गेला.
बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी केकेने जवळपास 3500 जिंगल्स गायल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ संगीतप्रेमींच्या हृदयावर राज्य करणारा आवाज आता नि:शब्द झाला आहे.