Kitchen Cinnamon Benefits : आपल्या स्वयंपाकघरात अशा अनेक गोष्टी असतात ज्याचा वापर करून आरोग्याशी संबंधित अनेक समस्या दूर केल्या जाऊ शकतात. आज आपण दालचिनीबद्दल माहिती घेणार आहोत. दालचिनी जेवणाची चव तर वाढवतेच पण आरोग्याच्या अनेक समस्यांपासून वाचवते. पण तुम्हाला माहित आहे का की जर महिलांनी दालचिनीचे सेवन केले तर रजोनिवृत्तीच्या समस्येवर मात करता येते. शिवाय त्यांना PCOD सारख्या समस्यांपासूनही आराम मिळतो. स्वयंपाकघरातील या दालचिनीची कमाल महिलांनी जाणून घेतली पाहिजे. आज आम्ही तुम्हाला तुमच्या आहारात दालचिनीचा समावेश कसा करू शकता. आणि त्याचा फायदा नेमका काय आहे हे जाणून घेऊया.
महिलांनी दालचिनीचे सेवन का करावे
-महिलांना मासिक पाळीच्या वेळी पोटदुखी सारख्या समस्यांना तोंड द्यावे लागते. अशावेळी तुम्ही दालचिनीचा वापरा करा. या दरम्यान दालचिनीचा चहा किंवा दालचिनीचे पाणी घेऊ शकतात.
-आजकाल धावपळीमुळे तसेच बदलत्या लाईफस्टाईलमुळे अनेक मुली-महिलांना पीसीओडीची समस्या होत आहे. ही समस्या हार्मोन्सशी संबंधित असते. जेव्हा ही समस्या उद्भवते तेव्हा तणावासोबतच महिलांना अनियमित मासिक पाळीच्या समस्येलाही सामोरे जावे लागते. अशावेळी दालचिनीचा वापर तुम्हाला उपयुक्त ठरू शकतो.
-रजोनिवृत्तीमुळे महिलांना अनेकदा चिडचिड, तणाव, डोकेदुखी, मूड बदलणे अशा समस्यांना तोंड द्यावे लागते. अशा परिस्थितीत महिलांनी दालचिनीचे सेवन केल्यास रजोनिवृत्तीच्या काळातही विविध समस्यांपासून सुटका मिळू शकते.
टीप – महिला त्यांच्या आहारात दालचिनीचा समावेश करू शकतात. पण जर महिलांना इतर काही समस्या असतील तर दालचिनीचा आहारात समावेश करण्यापूर्वी एकदा तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









