सापाला पाहून न घाबरणारा माणूस शोधूनही सापडणार नाही, हे सत्य आहे. साप विषारी आहे की नाही, हे जाणूनही न घेता तो दिसला की बहुतेक माणसे त्याला मारायला उठतात. केवळ माणूसच नव्हे, तर इतर बरेच पशुपक्षीही सापाला पाहून घाबरतात आणि त्याच्या वाटेला जात नाहीत. पण काही लोकांना विषारी साप पाळण्याचा आणि त्यांच्याशी खेळ करण्याचा छंद असतो. विषारी सापांमध्ये नाग हा सर्वात विषारी आणि घातक असतो. पण त्यालाही पाळणारे लोक असतात. अशाच एका नागप्रेमीने अनेक नाग पाळले होते आणि तो त्यांना हाताळत असतो. इतकेच नव्हे, तर एकाचवेळी पाच नागसर्पांचे चुंबन घेण्याचा त्याने प्रयत्न केलेला आहे. त्याचा हा व्हिडीओ प्रसिद्ध झाला आहे. तथापि, हे साप त्याला काहीही इजा करीत नाहीत. तथापि हा खेळ धोकादायक आहे.
या व्यक्तीने असे सारखे करु नये. त्याचा जीव जाऊ शकतो, असे सल्ले त्याला सोशल मिडियावरुन देण्यात येत आहेत. कारण नागसाप हे कधींही माणसाळत नाहीत. त्यांची सर्पवृत्ती केव्हा जागृत होईल हे सांगता येत नाही. त्याने घेतलेला एकच विषारी चावा जीव गमावण्यास कारणीभूत ठरु शकतो. त्यामुळे सापांशी खेळताना स्वत:च्या सुरक्षेची पूर्ण दक्षता घेऊनच ते करावे, असे सांगितले जाते.









