प्रतिनिधी /फोंडा
मडगाव येथील ‘डिवेरा’ गोल्ड ऍण्ड सिल्वर ज्वेलरी आस्थापनामध्ये किसना रियल डायमंड ऍड गोल्ड ज्वेलरीचे विक्री प्रदर्शन भरविण्यात आले आहे. शनिवार 16 पासून या प्रदर्शनाला सुरुवात झाली असून बुधवार 20 पर्यंत ते खुले राहणार आहे.
किसनासह, भुमिया, पर्पल, स्वस्तिक, पद्माप्रभू या नामांकित ब्रॅण्डचे शुद्ध हिरे व सोन्याने मढविलेले विविध प्रकारचे दागिने या प्रदर्शनात उपलब्ध करण्यात आले आहेत. ग्राहकांना रु. 6800 पासून किंमतीचे दागिने याठिकाणी खरेदी करता येतील. रॉयल फुडस्जवळ, लिले गार्मेटच्या समोर न्यू मार्केट पाजीफोंडा मडगाव येथे असलेल्या डिवेराच्या शोरुमध्ये हे प्रदर्शन खुले आहे. ग्राहकांनी या प्रदर्शनाला आवर्जून भेट देण्याचे आवाहन डिवेराचे मालक दामू रायकर यांनी केले आहे.









