वृत्तसंस्था /भुवनेश्वर
चीनमध्ये सुरु असलेल्या आशिया क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या भालाफेकमध्ये बुधवारी रौप्यपदक मिळवणारा ओडिशाचा भालाफेकपटू किशोर जेना याला ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी 1.5 कोटी रुपयाचे बक्षीस जाहीर केले आहे. 2024 साली होणाऱ्या पॅरीस ऑलिम्पिक स्पर्धेसाठी किशोर जेना पात्र ठरला आहे. या क्रीडा प्रकारात भारताच्या नीरज चोप्राने सुवर्णपदक मिळवले आहे. किशोर जेनाने 87.54 मी.ची नोंद केली असून त्याची ही सर्वोत्तम कामगिरी आहे.