संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी सामाजिक व न्यायमंत्री चंद्रकांत हंडोरे यांनी केली निवड
ओटवणे प्रतिनिधी
भीमशक्ती या सामाजिक संघटनेच्या जिल्हा सिंधुदुर्ग अध्यक्षपदी किशोर जाधव यांची निवड करण्यात आली आहे. भिमशक्ति संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा महाराष्ट्राचे माजी सामाजिक व न्यायमंत्री चंद्रकांत हंडोरे यांनी ही निवड केली आहे. किशोर जाधव विद्यार्थी दशेपासुनच समतावादी विद्यार्थी संघटनेत कार्यरत आहेत. मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शासनाच्या अनेक योजनांचा लाभ मिळवुन देण्यासह त्यांना शिक्षणासाठी मार्गदर्शन केले. आंबेडकरवादी चळवळीत त्यांचे वडील १९५१ पासुन असल्याने लहानपणापासूनच किशोर जाधव या चळवळीत कार्यरत आहेत. दलित समाजावरील अन्याय विरोधात आवाज उठवून त्यांना नेहमीच न्याय मिळवून दिला. सामाजिक व वैचारिक परिवर्तन घडवून आणण्यासाठी ही त्यांनी काम केले. सध्या ते किशोर जाधव भारतीय दलित महासंघाचे सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष असुन त्यांनी आजपर्यंत केलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांची भिमशक्ती या संघटनेच्या सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.यावेळी भीमशक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत हंडोरे शशिकांत बनसोडे, एन. के. कांबळे, कैलास आरवडे, हरीश सातपुते, विजय मोरे, शाम भाई, महेश कांबळे, अनिरुद्ध कांबळे, चंदन जाधव, विश्वास कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.









