रितेश चोरटे उत्कृष्ट पोझर
बेळगाव : बेळगाव जिल्हा शरीरसौष्ठव संघटना व राणी पार्वती देवी कला व वाणिज्य महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने 14 व्या आरपीडी श्री महाविद्यालय शरीरसौष्ठव स्पर्धेत किशोर पुजारीने आपल्या पिळदार शरीराच्या जोरावर आरपीडी श्री हा किताब पटकाविला. तर उत्कृष्ट पोझर म्हणून रितेश चोरटेने बाजी मारली. आरपीडी महाविद्यालयाच्या सभागृहात घेण्यात आलेल्या या स्पर्धेत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अभय पाटील यांनी दीपप्रज्वलन व हनुमान मूर्तीचे पूजन करुन उद्घाटन केले. या स्पर्धेत जवळपास 15 शरीरसौष्ठवपटूंनी भाग घेतला होता.
- 60 किलो वजनी गटात : 1) रितेश चोरटे-बीबीए, 2) मल्लेश तलरेजा-बीए-2, 3) ओमकार कोडती-बीए-2.
- 65 किलो वजनी गटात : 1) गजानन पाटील-बीए-1, 2) निल बांदेकर-पियुसी-1.
- 70 किलो वजनी गटात : 1) किशोर पुजारी-बीए-3, 2) आदित्य सपकाळ-पियुसी-2
आरपीडी श्री साठी रितेश चोरटे, गजानन पाटील व किशोर पुजारी यांच्यात लढत झाली. त्यामध्ये रितेश व किशोर यांच्यात तुलनात्मक लढत झाली. पण आपल्या पिळदार शरीराच्या जोरावर किशोर पुजारीने आरपीडी श्री हा किताब पटकाविला. तर उत्कृष्ट पोझर म्हणून रितेश चोरटेला बहुमान मिळाला. स्पर्धेनंतर प्राचार्य डॉ. अभय पाटील, प्रा. एस. एच. पाटील, प्रा. प्रसन्ना जोशी, डॉ. रामकृष्ण, गंगाधर एम. आदी मान्यवरांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना मानाचा किताब, चषक, प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले. स्पर्धेसाठी पंच म्हणून एम. गंगाधर, सुनील पवार,नूर मुल्ला व सुनील राऊत यांनी काम पाहिले.









