वार्ताहर/किणये
आपुलिया हिता जो असे जागता !धन्य माता पिता तयाचिया !! कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक ! तयाचा हरिख वाटे देवा !! गीता भागवत करिती श्रवण! अखंड चिंतन विठोबाचे !! तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा ! तरी माझ्या दैवा पार नाही!!
संत तुकाराम महाराज यांच्या या अभंगाप्रमाणे प्रत्येक घरामध्ये गीता ,भागवत यांचे वाचन, श्रवण केले पाहिजे .विठ्ठलाचे नामस्मरण केले पाहिजे . या अभंगाबद्दलची सविस्तर माहिती नाव घेते ह भ प शशिकांत गावडे महाराज यांनी आपल्या कीर्तन निरूपणाच्या माध्यमातून सांगितली.
शुक्रवारी सायंकाळी नावगे येथील रामलिंग मंदिरात कीर्तनाचा कार्यक्रम गावातील हभप बसवानी सुतार व मोहन सुतार यांनी आयोजित केला होता. या कार्यक्रमाला पंचक्रोशीतील वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मंदिरात टाळ मृदुंग व विठ्ठल नामाचा गजर झाला होता. कीर्तनासाठीची पंचपदी मंडोळी येथील ह भ प मारुती महाराज यांनी केली. संसार करत परमार्थ करावा आणि भगवंताचे नामस्मरण करावे असेही शशिकांत महाराज यांनी आपल्या कीर्तनातून उपस्थित भाविकांना सांगितले.
यावेळी सुरेश सुतार ,सातेरी सुतार ,शंकर येळूरकर, कृष्णा बेळगावकर, मधु पाटील, कृष्णा पाटील आदींसह परिसरातील विविध गावांमधील वारकरी उपस्थित होते.









