दापोली प्रतिनिधी
दापोली तालुक्यातील मुरुड येथील साई रिसॉर्टवर कारवाईच्या आग्रही मागणीसाठी भाजपचे मा. खासदार किरीट सोमय्या हे आज पुन्हा दापोलीत येणार आहेत. यामुळे दापोलीमध्ये पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. हे रिसॉर्ट शिवसेनेचे नेते व तत्कालीन पालकमंत्री अनिल परब यांचे असल्याचा सोमय्या यांचा आरोप आहे.
आज शनिवारी सकाळी सोमय्या हे ठाणे येथून खेडकडे रेल्वेने रवाना झाले आहेत. ते पावणे बारा वाजता खेड येथे पोहोचतील. यानंतर मुरुड ग्राम पंचायत ते साई रिसॉर्ट अशी पदयात्रा करणार आहेत. या दरम्यान त्यांचे ठिकठिकाणी जंगी स्वागत देखील करण्यात येणार आहे. किरीट सोमय्या यांच्या आजच्या दौऱ्यामुळे दापोलीतील वातावरण पुन्हा तणावाचे बनले असून पोलिसांनी बंदोबस्तात वाढ केली आहे.