उचगाव/वार्ताहर-
उचगाव ता.करवीर मुख्य प्रवेशद्वाराजवळ छत्रपती शिवाजी महाराज चौकात भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या हे केंद्रीय सुरक्षा यंत्रणेला हाताशी धरून महिलांचे शोषण करतात व महाराष्ट्रातील महिलांबद्दल अपशब्द काढल्याच्या निषेधार्थ करवीर शिवसेनेच्या(ठाकरे गट) वतीने किरीट सोमय्याच्या पोस्टरवर काळे फासत त्याला उलटा करून चपलाने मारत त्याला तुडवले. यावेळी शिवसैनिक आक्रमक झाले होते .
यावेळी बोलताना राजू यादव म्हणाले की, केंद्रीय यंत्रणा हाताशी धरून अनेक महिलांना ब्लॅकमेल करून त्यांचे लैंगिक शोषण केल्याचे त्या व्हिडिओ च्या माध्यमातून दिसत आहे, आता भाजपा त्याच्यावर काय कारवाई करणार? असा सवाल करीत सोमय्याने अनेक मोठमोठ्या नेत्यांचे भ्रष्टाचार बाहेर काढण्याच्या नावाखाली भाजपात भरती करून घेतले आहे. सोमय्या ला कारवाई करून त्याला अटक झाली नाही तर यापुढे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येईल.
यावेळी उपजिल्हाप्रमुख पोपट दांगट, उपजिल्हा समन्वयक विक्रम चौगुले, दीपक रेडेकर यांनीही भाजपवर निशाणा साधत किरीट सोमयावर कारवाई करून त्याला जेलमध्ये टाकण्याची मागणी केली. भर पावसात शिवसैनिक व महिलांनी निषेधाच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
या आंदोलनात करवीर तालुकाप्रमुख राजू यादव, उपजिल्हाप्रमुख पोपट दांगट, उंचगावचे उपसरपंच विराग करी, दीपक रेडेकर, विक्रम चौगुले, योगेश लोहार, राहुल गिरुले, कैलास जाधव, सचिन नागटिळक, संगीता आवळे, सुरेखा लोंढे, कमल कोगले, हौसाबाई सोनुले, गांधीनगरचे सुनील पारपाणी, किशोर कामरा, अजित पाटील, अजित चव्हाण, बंडा पाटील, आबा जाधव आदी शिवसैनिक, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.









