Kirit Somaiya Visit In Kolhapur : रजत प्राव्हेट लिमिटेड आणि माऊंट प्रायव्हेट लिमिटेड या मृत कंपनीकडून चेक दिला जातो यानंतर हसन मुश्रीफ यांच्या खात्यावर 59 कोटी 85 लाख जमा होतात हे कस शक्य आहे? हे हसन मुश्रीफ यांनी कोल्हापूरच्या जनतेला सांगांव.तुम्ही ग्रामविकास मंत्री असताना तुमच्या जावयाच्या कंपनीला प्रत्येक ग्रामपंचायतीकडून 50 हजार रूपये देण्याचा आदेश काढला होता याविषयी सांगा. राज्यातील 27 हजार आठशे ग्रामपंचायतींनी दरवर्षी 50 हजार म्हणजेच एकूणच दरवर्षी 150 0 कोटी रूपयांचं भुर्दंड, 10 वर्षाचं कान्ट्रक्ट कसं काढल याचा खुलासा द्या. आम्ही घोटाळा बाहेर काढल्यावर तो आदेश रद्द केला गेला पण याची चौकशी होणारच मला मुख्यमंत्री आणि उपमुख्य़मंत्री यांनी वचन दिलं आहे, की याची चौकशी होणारचं, अशी प्रतिक्रिया भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिली. आज त्यांनी कोल्हापुरात पत्रकारांशी संवाद साधत असताना हसन मुश्रिफ यांच्यावर निशाणा साधला.
यावेळी सोमय्यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावरही टिका केली. “शरद पवार यांच्यामध्ये हिंमत असेल, तर मुश्रीफ यांच्या वक्तव्याला समर्थन द्यावे. मुस्लीम नेत्यांना टार्गेट केलं जातं असं पवार यांनी म्हणावं. द्धव ठाकरे यांनी म्हणावे हे मान्य आहे का? भ्रष्टाचार करताना जात आठवली नाही का? दोन्ही हातात हिरवा झेंडा घेतलेल्या उद्धव ठाकरे यांनी देखील भूमिका जाहीर करावी असेही सोमय्या म्हणाले.
मुंबई महापालिकेत कोविड घोटाळा झाला. तत्कालीन सत्ताधारी नेत्यांसाठी कोविड हे कमाईचं साधन होतं. संजय राऊत यांचे सहकारी सुजित पाटकर यांनी लाईफलाईन रुग्णालय सर्व्हिसेसला १०० कोटी रुपयांचं कंत्राट मिळालं. ही कंपनी कधीच अस्तित्वात नव्हती. तसेच, त्यांना रुग्णालयाच चालवण्याचा कोणाताच अनुभव नाही. मग, या कंपनीला १०० कोटी रुपयांचं कंत्राट कसं दिलं. या कंपनीच्या हलगर्जीपणामुळे अनेक करोना रुग्णांचा मृत्यू झाला, असेही किरीट सोमय्यांनी सांगितलं.
Previous Articleमंदी आलीच, तर जूनमध्ये येईल
Next Article ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेतील पंचांना धमकीचा फाेन








