आयझोल
भाजपने केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांना मिझोरामसाठी पक्षाचा निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्त केले आहे. भाजपचे राष्ट्रीय सचिव अनिल अँटनी आणि नागालँडचे उपमुख्यमंत्री यानथुंगो पॅटन हे मिझोराम निवडणुकीसाठी पक्षाचे सह-प्रभारी म्हणून काम करणार आहेत. मिझोराममधील सर्व 40 जागांवर 7 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून 3 डिसेंबर रोजी मतमोजणी पार पडणार आहे.









