बँकॉकमधील एशियन शरीरसौष्ठव स्पर्धा
बेळगाव : बँकॉक-थायलंड येथे झालेल्या एशियन शरीरसौष्ठव आणि फिजिक्स स्पर्धेत 100 किलो गटात भारताच्या (बेळगाव) किरण बसवराज वाल्किमीने आपल्या पिळदार शरीराच्या जोरावर कांस्यपदक पटकाविले. या गटात थायलंडच्या पँटवाट निमिटीपिकापोमने प्रथम क्रमांक तर उझ्बेकिस्तानच्या स्क्रिपीचाऊ विटालीयाने रौप्य पदक पटकाविले. 57 व्या एशियन शरीरसौष्ठव स्पर्धेत सहभागी झालेल्या भारतीय संघातील बेळगावच्या किरण बसवराज वाल्मिकीने 100 किलो वजनी गटात पहिल्या दहा शरीरसौष्ठवपटूंमध्ये स्थान मिळविले. त्यानंतर अंतिम फेरीत तो कांस्य पदकाचा मानकरी ठरला. या गटात पँटवाट निमिटीपिकापोम याने सुवर्ण, उझ्बेकिस्तानच्या स्क्रिपीचाऊ विटालीयाने रौप्य पदक मिळविले. पाकिस्तानच्या हनीफ मोहम्मदने चौथा क्रमांक तर भारताच्या विजय बोयारने पाचवा क्रमांक पटकाविला. मान्यवरांच्या हस्ते किरण वाल्मिकीला कांस्यपदक देण्यात आले. तो भारतात आल्यानंतर आयबीबीएफच्या पदाधिकाऱ्यांनी शरीरसौष्ठवपटूंचा विमानतळावर स्वागत करून खास गौरव केला.









