माजी मुख्यमंत्री स्व. रवी नाईक यांच्या तसबिरीला वाहिली पुष्पांजली
फोंडा : बहुजनांचे कैवारी माजी मुख्यमंत्री तथा कृषीमंत्री दिवंगत रवी सिताराम नाईक यांच्या निधनानंतर दै. ‘तरुण भारत’चे समूह संपादक किरण ठाकुर यांनी नुकतीच स्व. रवी नाईक यांचे ज्येष्ठ सुपुत्र रितेश नाईक यांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. फर्मागुडी येथील पीईएस शैक्षणिक संकुलातील दिवंगत रवी नाईक यांच्या तसबिरीला पुष्पांजली वाहून आदरांजली वाहण्यात आली. यावेळी त्यांच्यासोबत दै. ‘तरुण भारत’ गोवा आवृत्तीचे संपादक सागर जावडेकर, फोंडा नगरपालिकेचे नगराध्यक्ष आनंद नाईक, पीईएस संस्थेचे खजिनदार प्रकाश बाळवे उपस्थित होते. यावेळी पात्रांव रवी नाईक यांच्याशी असलेल्या जिव्हाळ्याच्या संबंधावर किरण ठाकुर यांनी आठवणींनी उजाळा दिला.









