वृत्तसंस्था / इकसेन सिटी (कोरिया)
विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या येथे सुरू असलेल्या 300 दर्जाच्या कोरिया मास्टर्स आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या किरण जॉर्जने पुरुष एकेरीची उपांत्यफेरी गाठताना जपानच्या पाचव्या मानांकित ओबाएशीचा पराभव केला.
शुक्रवारी खेळविण्यात आलेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात 41 व्या मानांकित तसेच 24 वर्षीय किरण जॉर्जने जपानच्या पाचव्या मानांकित ताकुमा ओबायाशीचा केवळ 39 मिनिटात 21-14, 21-16 अशा सरळ गेम्समध्ये फडशा पाडला. त्याचप्रमाणे दुसऱ्या एका सामन्यात थायलंडच्या टॉपसिडेड आणि पाचव्या मानांकित व्हिटीडसेनने चीनच्या लियु लियांगचा 21-15, 21-11 अशा सरळ गेम्समध्ये फडशा पाडून शेवटच्या चार खेळाडूंत स्थान मिळविले. या स्पर्धेत किरण जॉर्जने चीन तैपेईच्या जेनचा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले होते.









