चंदीगड :
हरियाणात काही महिन्यापूर्वी काँग्रेस सोडून भाजपमध्ये सामील झालेल्या किरण चौधरी यांनी आता विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. किरण चौधरी यांना आता भाजप राज्यसभेवर पाठविणार असल्याची चर्चा आहे. हरियाणात बुधवारी राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अखेरचा दिवस आहे. काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हु•ा यांनी यापूर्वीच राज्यसभा निवडणुकीसाठी पक्षाकडून उमेदवार उभा केला जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.









