वृत्तसंस्था/ मेलबर्न
या महिन्यांच्या अखेरीस होणाऱ्या युनायटेड चषक मिश्र सांघिक टेनिस स्पर्धेतून चीनची ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेती झेंग किनवेनने माघार घेतली आहे. जानेवारीच्या उत्तरार्धात होणाऱ्या ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेसाठी सरावावर अधिक लक्ष केंद्रीत करण्याच्या हेतून किनवेनने हा निर्णय घेतला आहे.
पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत चीनच्या किनवेनने सुवर्णपदक पटकाविले होते. पण डब्ल्यूटीए फायनल्स स्पर्धेत तिला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. युनायटेड चषक मिश्र सांघिक टेनिस स्पर्धा 27 डिसेंबरपासून सुरु होणार आहे.









