न्यायालयीन लढा उभारण्याचा निर्णय
घुणकी प्रतिनिधी
मुख्यमंत्री सौर कृषी योजनासाठी किणी येथील गायरान जमिनीची मोजणी करण्यास आलेल्या शासकिय अधिकाऱ्यांना ग्रामस्थांनी तीव्र विरोध केला. आणि सदरची मोजणी तहकूब करण्यास भाग पाडले, गायरान जमीन आम्ही देणार नाही अशी ठाम भूमिका घेऊन या विरोधात प्रसंगी न्यायालयीन लढा उभारू असे संजय बी पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
राज्यातील घरगुती, औद्योगिक ,वाणिज्यिकाना गेल्या अनेक वर्षापासून कोळसानिर्मित वीज प्रकल्पातून विजेचा पुरवठा केला जातो .यामुळे प्रदूषण वाढत चालल्याने महावितरण कंपनीने ग्राहकांच्या मागणीचा भविष्य काळातील विचार करून सौर ऊर्जा प्रकल्पावर भर दिला आहे. यामध्ये मुख्यमंत्री कृषी वाहिनी योजना राबवण्याचे निर्णय घेतला आहे. सन २०२५ पर्यंत सुमारे आठ हजार मेगावॅट विजेची निर्मिती करण्याचे धोरण अवलंबली आहे .२०२३ अखेर पर्यंत वीज निर्मितीचा करार करण्यात आला आहे .त्यापैकी ६०० मेगावॅट वीज कार्यान्वित झाली आहे. उर्वरित विजेची पूर्तता करण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील दहा किलोमीटर अंतरावर सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचे काम सुरू केले आहे .
आज किणी येथे महावितरण, भूमि अभिलेख ,महसूल विभागाचे अधिकारी येथील हत्ती माळ व हंजेमळा येथील जमीन मोजणी करण्यासाठी आले असताना किणी ग्रामस्थांनी सदर जमीन मोजणी करण्यास तीव्र विरोध केला.
ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या बैठकीत ग्रामस्थांनी आपल्या भावना व्यक्त केल्या यामध्ये हत्ती माळ येथील दहा हेक्टर गायरान जमीन ही भविष्यकाळात सार्वजनीक ऊपक्रम व गावाच्या विस्ताराकरणासाठी उपयुक्त असल्याने तसेच या ठिकाणी भूमी हीन बेघरांना गृह प्रकल्पासाठी ही जमीन आवश्यक आहे. तसेच या जमिनीवर देवराई सारख्या प्रकल्पातून व सामाजीक वनीकरणातून वृक्ष लागवड केली आहे .आम्हाला या गायरान जमिनीची गरज आहे. त्यामुळे ही जमीन आम्ही देऊ शकणार नाही असे मत मांडले. तर हंजे मळा येथील गायरान हे दसऱ्याच्या पालखीचा मार्ग असल्याने या ठिकाणी सायंकाळच्या सुमारास पालखी प्रदीर्घ काळ थांबते. त्यानंतर पुढील मिरवणुकीला सुरुवात होते तसेच घनकचरा व्यवस्थापन . स्मशानभूमी . दफनभूमी . या ठिकाणी आहे. त्यामुळे या गायरान जमीनीची
ग्रामपंचायतीला गरज आहे .तसेच या दोन्ही जमिनी गायरान व सरकार हक्क मालकीच्या असल्याने या जमिनीवर पूर्ण हक्क हा ग्रामपंचायतीचा गावच्या नागरिकांच्या गरजेच्या सुविधासाठी आहे. त्यामुळे दोन्ही गायरान जमिनी कुठल्याही परिस्थितीत देणार नाही यासाठी जनआंदोलन उभा करू तसेच न्यायालयीन लढा ही उभारू अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली .अखेर मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांनी सामंजस्याची भूमिका स्वीकारून आलेली मोजणी स्थगित केली.
यावेळी सरपंच सुप्रिया समुद्रे, उपसरपंच अशोक माळी ,माजी सरपंच बाळासो पाटील ,माजी उपसरपंच महावीर पाटील, तंटामुक्त अध्यक्ष दीपक घाटगे ,अजित पाटील, जयकुमार पाटील, नंदकुमार माने ,अभय पाटील ,सागर धनवडे, पोलीस पाटील सुगंध समुद्रे ,प, वैभव कुंभार ,बंदेनवाज मुजावर ,संताजी माने, रणजीत निकम ,शांतिनाथ पाटील, विजय धनावडे, धीरज चव्हाण ,हंबीरराव पाटील, तलाठी श्रीमती मोमीन ,मोजणी अधिकारी राहुल पाटील आदी उपस्थित होते.









