कोकणात फलोत्पादन आणि मासेमारी या व्यवसायांवर उपजिवीका करणाऱयांची लोकसंख्या मोठी आह़े फलोत्पादनात आंब्यासारख्या नगदी पिकावर लोकांचा मोठा भर आह़े एका बाजूला लोकप्रियता असली तरी निसर्गाची आणि काही प्रमाणात मानवनिर्मित आव्हाने उभी राहिल्याने आंब्याचा व्यवसाय अनेक आव्हानांसह पुढे येत आह़े
मे महिना म्हणजे आंब्याचा सुगी काळ सर्वाधिक फळ तोड या महिन्यात होत असत़े पावसापूर्वी आंब्याचा हंगाम संपुष्टात येत़ो पावसाला सुरूवात होण्यापूर्वी अधिकाधिक फळे हाती लागावीत म्हणून शेतकऱयांचे मोठे प्रयत्न असतात़ कोकणातील हापूस आंब्याची लागवड आणि मुंबई बाजारात पाठवणी हा फार जुन्या काळापासून परिपाठाचा असलेला व्यवसाय आह़े सुरूवातीच्या टप्प्यात रस्ते वाहतूक अवघड होत़ी त्यावेळी समुद्र मार्गाने आंबा वाहतूक सुरू होत़ी कोकणातील बंदरातून आंबा करंडे मुंबईला रवाना होत असत़ भाऊच्या धक्क्यावर पार्सले उतरवून ती फळबाजारात घाऊक फळविक्रेत्यांकडे पोहोचवली जात
असत़
पुढे काळ बदलला रस्ते वाहतूक अधिक सुगम झाल़ी 2000 च्या दशकामध्ये व्यापक प्रमाणात फळ झाड लागवडीच्या आणि कोकणात मोठी फळझाड लागवड झाल़ी सध्या रत्नागिरी जिह्यात 67 हजार हेक्टर तर सिंधुदुर्ग जिह्यात 39 हजार हेक्टर जमिनीवर आंबा लागवड झाली आह़े विषृववृत्ताला जवळच्या भागात आंबा अधिक तयार होत़ो म्हणजे दक्षिण कोकणात वेंगुर्ले देवगड परिसरात तो आधी तयार होत़ो रत्नागिरी, दापोली, अलिबाग परिसरात उत्तरोत्तर उशिरा तयार होत असत़ो याशिवाय समुद्रापासून पहिल्या पाच किलो मिटर हवाई अंतरातील आंबा झाडे लवकर फुलावर येतात़ तर सह्याद्रीच्या दिशेतील आंबा झाडे उशिराने फळ धारणेसाठी तयार होत असतात़
गेल्या दशकभरामध्ये बदलत्या हवामानामुळे आंबा उत्पादनाचे कोष्टक बदलले आह़े 2009 साली फयान वादळामुळे रत्नागिरीच्या किनारपट्टीला जोरदार तडाखा बसल़ा नोव्हेंबर महिन्यात हे वादळ झाले असले तरी पुढील अनेक महिने आंबा-फणस, नारळासह सर्वच सृष्टीवर या वादळाचा दुष्परिणाम झाल़ा
त्या वर्षी स्वाभाविकच मोहोर धरण्यापासून सर्व टप्पे लांबत गेल्याने उत्पादनाला फटका बसला. पण त्यानंतरही गेल्या दहा-बारा वर्षांत कोकणातील वातावरण प्रचंड बदलले आहे. लांबणारा पावसाळा, लहरी टिकणारी थंडी आणि भाजून काढणारा उन्हाचा कडाका, त्याही पेक्षा गंभीर बाब म्हणजे हिवाळा व उन्हाळा ऋतू असूनही भरून येणारं मळभ असे चित्र अनुभवास येत आह़े ऋतुचक्राचे विपरीत वर्तन कोकणातील फळपिकांना त्रासदायक ठरत आहे. हे कमी होते म्हणून की काय, गेली दोन वर्षे चक्रीवादळांनीही त्याला झोडपले. या बदललेल्या हवामानाचा उत्पादनावर विपरीत परिणाम झाला आहे. दरवर्षी कोकणातून गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सुमारे एक लाख पेटी आंबा वाशीच्या घाऊक बाजारपेठेत जातो. यंदा हा आकडा 21 हजारांवर अडकला. दरवर्षी पाडव्यानंतर पुढे उत्पादन वाढत जाते, परंतु यंदा तेही कमी झाले आहे. अक्षय्य तृतीयेला म्हणजे मे महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात 1 लाख आंबा पेटी मुंबईच्या वाशी फळ बाजारात कोकणातून जाऊन पोहोचल़ी
वातावरणातील बदलांमुळे फैलावणाऱया कीडरोगाचेही प्रमाण वाढले आहे. गेल्या वर्षी मोसमी पावसाचा कालावधी ऑक्टोबरपर्यंत लांबल्यामुळे हंगामाच्या सुरुवातीलाच अपशकुन झाला. त्यानंतरही प्रत्येक महिन्यात हजेरी लावलेल्या अवकाळी पावसाने मोहोर, कणी आणि कैरीला फटका बसला. फुलकिडी, तुडतुडा, खार पडण्यासारख्या बुरशीजन्य रोगांनी बागायतदार त्रस्त झाले. यामधून सावरण्यासाठी खते, औषधांच्या फवारण्या वाढल्या. त्यामुळे उत्पादन खर्चातही वाढ झाली, पण उत्पादनात घट झाली.
मे महिन्याच्या पहिल्या आठवडय़ापासून मोठय़ा प्रमाणात आंबा फळ तोडीला सुरूवात झाली आह़े येत्या 15 दिवसांत रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिह्यांतून हापूसची आवक मुंबई बाजारात वाढेल़ त्याचबरोबर पुणे, कोल्हापूरसह राज्यातील अन्य बाजारपेठांमध्ये हापूसची आवक मोठय़ा प्रमाणात वाढेल असे चित्र दिसत आहे. वेगवेगळ्या कारणांमुळे वाढलेल्या तापमानामुळे आंबा वेगाने तयार होऊ लागला आहे. परिणामी, बागायतदार झाडावरील फळ काढणीकडे जास्त भर देऊ लागला आहे. शिवाय मेच्या तिसऱया आठवडय़ापासून केव्हाही पाऊस पडण्याची शक्यता आह़े गतवर्षी मेमध्ये कोकणात पाऊस आला होत़ा उशिरापर्यंत फळे झाडावर ठेवण्याऐवजी लवकरात लवकर काढून बाजारात रवाना करण्यासाठी शेतकरी विशेष लक्ष देत आहेत़
सुरुवातीच्या टप्प्यात अगदी एप्रिलच्या मध्यापर्यंत कमी उत्पादनाची नोंद यंदा झाली आहे. त्यामुळे बाजारातील दर वधारलेले होते. पाच डझनच्या पेटीला सर्वाधिक साडेपाच हजार रुपये दर मिळत होता. 25 एप्रिलनंतर त्यात घसरण सुरू झाली असून ती अजून चालू आहे. हे चित्र लक्षात घेता, 4 मे पासून हापूसचे यावर्षातील सर्वात कमी दर असतील अशी अपेक्षा व्यक्त होत आह़े याचबरोबर, कोरोना ही बागायतदार आणि ग्राहकासाठीही जमेची बाजू ठरली आहे. आंब्याची मोठी बाजारपेठ दलालांच्या हातात असते. कोरोनाकाळातील निर्बंधांमुळे वितरण व्यवस्थेतील हा घटक थोडय़ा प्रमाणात का होईना, बाजूला झाल्यामुळे बागायतदार थेट ग्राहकांपर्यंत पोहोचला. गेली दोन वर्षे ही प्रणाली राबवून काही बागायतदारांनी स्वतंत्र विक्री यंत्रणा निर्माण केली. यावर्षी शेतकऱयांनी या प्रणालीचा उपयोग करून घेतल़ा त्याचबरोबर फळ बाजारातील दर बऱयापैकी टिकून राहिल्याने पहिल्या टप्प्यात फळ बाजारावर अवलंबून होत़े
फळांच्या राजाला गेली काही वर्षे हवामान बदलाचे फटके सातत्याने सहन करावे लागत आहेत. त्यातच लवकर फळे मिळावीत यासाठी आसुसलेल्या शेतकऱयांकडून संजीवके (कल्टार) वापरली जाऊ लागल़ी याशिवाय खतांच्या अतिरेकी माऱयामुळे अल्प काळात भरपूर उत्पादन, पण नंतर वठण्याचाही धोका याच्या नशिबी आला आहे. फळाच्या दर्जावर मोठा परिणाम होण्याची भीती व्यक्त होत
आह़े








