व्हीडीओच्या कमेंटस् बॉक्समध्ये चाहत्यांचा वर्षाव
मुंबई
बॉलीवूड किंग खानचा मुलगा अबरामचे एक खास व्हिडीओ इंटरनेटवर धुमाकुळ घालतो आहे. एक्स या अॅप वर (ट्विटर) वर ही व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये अबराम गिटार वाजवताना दिसत आहे. अबराम या व्हिडीओमध्ये लेडी गागा आणि ब्रुनो मार्स यांचे डाय विथ अ स्माईल या गाणं सादर करत आहे. हा व्हिडीओ अबरामच्या शाळेतील कार्यक्रमाचा आहे. या व्हिडीओवर शाहरुख खानच्या चाहत्यांनी कमेंटस् बॉक्स फुल करुन टाकला आहे, या व्हिडीओपाहून शाहरुख खानचे चाहते भारावून गेले आहेत.
बॉलीवूड किंग खान शाहरुख खानने ‘मुफासा’ या अॅनिमेटेड फिल्मला आवाज दिला आहे. याच सिनेमात ‘सिम्बा’ या पात्राला आर्यन खान ने तर मुफासाला अबरामने आवाज दिला आहे.









