वार्ताहर/किणये
बाल हनुमान कुस्तीगीर संघटना किणये यांच्यावतीने दसरा क्रीडा स्पर्धेतील कर्नाटक कंठीरवा किताबाचा मानकरी कामेश पाटील, सीएम कप विजेते प्रेम जाधव, स्वाती पाटील, कर्नाटक किशोर समर्थ डुकरे, विठ्ठल गुरव, समर्थ पाटील, श्रावणी डुकरे, साक्षी दळवी आदी मल्लांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्राथमिक विभागामधील श्रावणी डुकरेने 45 किलो वजन गटात तालुका पातळीवर प्रथम, साक्षी दळवी 42 किलो वजन गटात प्रथम,समर्थ पाटील 55 किलो वजन गटात तालुका पातळीवर प्रथम,विठ्ठल गुरव 47 किलो वजन गटात प्रथम क्रमांक व समर्थ डुकरे 57 किलो वजन गटात तुतिय मिळविल्याबद्दल या सर्व मल्लांचा सुरेश डुकरे, मारुती डुकरे, मल्ल महेश डुकरे, हेमंत पाटील, श्रीधर गुरव, वर्षा डुकरे, पुनम गुरव, निवृत्ती डुकरे, पुंडलिक दळवी आदींच्या हस्ते करण्यात आला.









