‘द कार्दशियन शो’च्या 6 व्या सीझनचा ट्रेलर जारी करण्यात आला आहे. यावेळी कार्दशियन फॅमिली एका नव्या प्रवासावर जाणार असून यात त्यांच्या वैयक्तिक आयुष्यासोबत परिवाराशी निगडित अनेक नवे खुलासे होणार आहेत. सहाव्या सीझनमध्ये मॉडेल्सच्या कारकीर्दीदरम्यान निर्माण हेणाऱ्या आव्हानांविषयी जाणता येणार आहे. याचबरोबर ट्रेलरमध्ये किम कार्दशियनच्या नव्या गुप्त प्रियकरासंबंधी हिंट मिळणार आहे. मॉडेलने या ट्रेलरमध्ये आपण सिंगल आहोत, असे खोटं बोललो होतो, अशी कबुली दिली आहे. प्रसारमाध्यमांना मी स्वत:च्या रिलेशनशिप स्टेट्सबद्दल खोटं बोलले होते. सिंगल राहण्याचाच माझा निर्धार होता, असे 44 वर्षीय किमने म्हटले आहे. किम कार्दशियनने यापूर्वी अनेक दिग्गज कलाकारांना डेट केले आहे. तिने 2000 साली डेमन थॉमससोबत विवाह केला होता, तेव्हा ती 19 वर्षांची होती आणि विवाहाच्या 4 वर्षांनी त्यांचा घटस्फोट झाला होता. यानंतर रेगी बुश नावाच्या फूटबॉलपटूला तिने डेट केले होते. यानंतर 2011 मध्ये तिने क्रिस हम्फ्रीजसोबत विवाह केला जो बास्केटबॉलपटू होता. हा विवाह महिन्याभरातच संपुष्टात आला होता.
2012 मध्ये तिने केनी वेस्टसोबत डेटिंग सुरू केले होते. 2014 मध्ये इटलीत एका भव्य सोहळ्यात दोघेही विवाहबद्ध झाले होते. या विवाहापासून जोडप्याला चार अपत्यं आहेत. 2021 साली किम आणि कान्ये वेस्टने घटस्फोट घेतला होता.









