रणगाडाभेदी क्षेपणास्त्राच्या बदल्यात धान्याची मागणी करणार/
वृत्तसंस्था/ प्योंगयांग
उत्तर कोरियाचा हुकुमशहा किम जोंग उन हे रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांची भेट घेण्यासाठी रशियाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यात किम हे हे पुतीन यांच्यासोबत युक्रेन युद्धादरम्यान शस्त्रास्त्रांचा पुरवठा आणि सैन्य सहकार्यावर चर्चा करणार आहेत. रशियाच्या दौऱ्यासाठी किम हे उत्तर कोरियाची राजधानी प्योंगयांग येथून रशियाचे शहर ब्लादिवोस्तोकसाठी रेल्वेने प्रवास करणार आहेत.
किम यांना हवाई प्रवासाची भीती वाटत असल्याने ते रेल्वेतून प्रवास करत असल्याचे मानले जाते. संबंधित रेल्वे 1949 मध्ये किम यांचे आजोबा किम इल संग यांना रशियाचे हुकुमशहा स्टॅलिन यांनी प्रदान केली होती. ही अनेक डबे असलेली इंटर कनेक्टेड रेल्वे आहे.
रशिया उत्तर कोरियाकडून आर्टिलरी शेल्स आणि रणगाडाविरोधी क्षेपणास्त्रs इच्छित आहे. याच्या बदल्यात उत्तर कोरिया रशियाकडून उपग्रह आणि आण्विक पाणबुडी तंत्रज्ञानाची मागणी करणार आहे. याचबरोबर किम जोंग उन हे स्वत:च्या देशासाठी अन्नधान्याचा पुरवठा इच्छित आहेत.
दोन्ही नेते 10-13 सप्टेंबरपर्यंत आयोजित होणाऱ्या ईस्टर्न इकोनॉमिक फोरममध्ये भाग घेण्यासाठी ब्लादिवोस्तोक येथे पोहोचणार आहेत. या दौऱ्यादरम्यान किम हे रशियाच्या प्रशांत महासागरातील नौदलाच्या तळालाही भेट देऊ शकतात. किम जोंग उन आणि ब्लादिमीर पुतीन हे दोघेही अमेरिकाविरोधी नेते म्हणून ओळखले जातात.









