नांद्रे, प्रतिनिधी
Sangli News : बेळगाव जिल्ह्यातील हिरेकोडी येथील जैन आश्रमाचे आचार्य श्री 108 कामकुमारनंदी महाराज यांच्या हत्येचा सकल दिगंबर जैन समाज बांधवाच्यावतीने निषेध करण्यात आला.जैन मंदीरापासून चावडी कार्यालय नांद्रे पर्यंत मूकमोर्चा काढण्यात आला.यावेळी नांद्रे गावातील सर्वधर्मीय बांधवानी आपला सहभाग नोंदवत निषेध व्यक्त केला. जगाला शांती व आहिंसेचा संदेश देणाऱ्या जैन मुनींची निर्घूण हत्या करणाऱ्यावर कठोर कारवाई करावी,आशी मागणी तलाठी यांच्याकडे करत लेखी निवेदन देण्यात आले.
हिरेकोडी आश्रमाचे जैन मुनीं कामकुमारनंदी महाराजांची हत्या झाली आहे. जैन समाज बांधव अत्यंत शोकमग्न झाले आहेत.जैन समाजाने नेहमीच शांतता व अहिंसा धर्माचे पालन केले.अशा समाजाच्या मुनींची हत्या होणे,दुदैवी आहे.त्यामुळे संबधित आरोपीवर कठोर कारवाई व्हावी आशी मागणी केली जात आहे.
यावेळी जिनेश्वर पाटील,राजगोंडा पाटील,मनोज पाटील,अमोल पाटील,नेमगोंडा पाटील,अमित पाटील,जंबुकुमार चौगुले,एन.जे.पाटील,अरूण पाटील,सुधीर चौधरी,धन्यकुमार हेरले,दादा इंगळे,अभिषेक पाटील,रमेश सांळुखे,शंशीकांत ऐडके यांच्यासह सकल जैन समाज बंन्धू भगिनी,युवक,सर्व धर्मीय समाज बांधव मोठ्या संखेने उपस्थित होते.








