दापोली :
तालुक्यातील उन्हवरे बौद्धवाडी येथे कौटुंबिक वादातून भावाचा कुऱ्हाडीने वार करून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आह़े ही घटना शनिवारी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास घडल़ी विनोद गणपत तांबे (36, ऱा उन्हवरे बौद्धवाडी, त़ा दापोली) असे मृताचे नाव आह़े या प्रकरणी दापोली पोलिसांनी रवींद्र गणपत तांबे याच्याविऊद्ध खूनाचा गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी त्याला अटक केली आह़े
रवींद्र व विनोद तांबे हे दोघे सख्खे भाऊ असून दोघांमध्ये कौटुंबिक वाद होत़ा 19 जुलै रोजी रात्री विनोद व रवींद्र यांच्यात बाचाबाची झाली होत़ी यातून वाद उफाळून आला आणि वादाचे पर्यवसान थेट मारहाणीत झाले. रवींद्र याने विनोद यांच्यावर कुऱ्हाडीने सपासप वार केले. कुऱ्हाडीचे घाव वर्मी बसल्याने यामध्ये विनोद हा रक्ताच्या थारोळ्dयात पडल़ा तसेच गंभीर जखमी झालेल्या विनोद याचा जागीच मृत्यू झाल़ा
या घटनेची माहिती मिळताच चिपळूण विभागाचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र राजमाने, पोलीस निरीक्षक महेश तोरस्कर, इतर अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी पंचनामा केल्यानंतर मृतदेह ताब्यात घेतला. फॉरेन्सिक टीमलाही घटनास्थळी पाचारण करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र, कुटुंबातील वाद किंवा जमीन-संपत्तीचा वाद या पार्श्वभूमीवर ही घटना घडल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा ऊग्णालय दापोली येथे आणण्यात आला. या प्रकरणाचा अधिक तपास दापोली पोलीस करीत आहेत.








