वैद्यकीय क्षेत्रात चालणाऱया भ्रष्टाचाराबद्दल सहसा बोलले जात नाही. पण अशी एक गंभीर घटना सध्या चर्चेचा विषय बनली आहे. उत्तर प्रदेशच्या अलीगडमधील एक होमगार्ड मुतखडय़ाची शस्त्रक्रिया करण्यासाठी रुग्णालयात गेला. त्याचे ऑपरेशन करण्यात आले आणि सर्व मुतखडे काढून टाकण्यात आले असून त्याचे प्रकृती आता ठणठणीत आहे, असे त्याला सांगण्यात आले.
शस्त्रक्रियेनंतर काही महिन्यांनी त्याच्या पोटाच्या खालच्या भागात असहय़ वेदना होऊ लागल्या. त्यामुळे तो पुन्हा रुग्णालयात गेला. तेथे अल्ट्रासाऊंडच्या माध्यमातून त्याचे परीक्षण करण्यात आले. तेव्हा त्याची एक किडनी (मूत्रपिंड) गायब असल्याचे डॉक्टरांना आढळून आले. होमगार्डला चांगलाच धक्का बसला. डॉक्टरांनी त्याची चौकशी केली असता त्याने मूतखडय़ाच्या शस्त्रक्रियेसाठी आपण अन्य रुग्णालयात गेलो होतो, असे स्पष्ट केले. आपण किडनी कोणालाही दान केलेली नाही. किडनी कशी गायब झाली, हे आपण सांगू शकणार नाही, अशी माहिती त्याने दिली. मुतखडय़ाची शस्त्रक्रिया करणाऱया डॉक्टरने कदाचित त्याचे मूत्रपिंडही काढले असावे आणि ते विकून मोठी कमाई केली असावी, असा तर्क करण्यात आला आहे. तथापि, हे पुराव्याने सिद्ध झाल्याखेरीज सदर डॉक्टरविरोधात कोणतीही कारवाई होणे अशक्मय असल्याचे तज्ञांचे मत आहे.
आता हे प्रकरण वरि÷ प्रशासकीय अधिकाऱयांकडे सुपूर्द करण्यात आले आहे. त्यांनी मुतखडय़ाची शस्त्रक्रिया करणाऱया खासगी रुग्णालयातील डॉक्टरची चौकशी सुरू केली आहे. या डॉक्टरने शस्त्रक्रियेची तारीख दोनदा बदलल्याचे आढळून आले आहे. कदाचित तो किडनी विकत घेणाऱया रुग्णाची वाट पहात असावा. यापूर्वीही कामगारांच्या किंवा गरीब व्यक्तींच्या अपेंडिक्स किंवा तत्सम शस्त्रक्रियांच्यावेळी त्यांची किडनी काढून घेण्याचे प्रकार उघडकीस आलेले आहेत. मानवी अवयवांना सध्या प्रचंड किंमत मिळत असल्यामुळे अशाप्रकारचा भ्रष्टाचार करण्याचा मोह काही डॉक्टरांना होतो. तथापि, असे प्रकार कठोर कारवाई करून बंद करणे हे प्रशासनाचे कर्तव्य असल्याचेही अनेक मान्यवरांचे म्हणणे आहे.









