रत्नागिरी प्रतिनिधी
तालुक्यातील निवळी गावडेवाडी येथे आंबा बागेच्या राखणीसाठी असलेल्या नेपाळी कुटुंबातील 14 वर्षीय मुलाचे अपहरण करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. धृवकुमार शोकबहादुर शाही ( रा. निवळी गावडेवाडी) असे अपहरण करण्यात आलेल्या मुलाचे नाव आहे. या प्रकरणी त्यांच्या पालकांनी रत्नागिरी ग्रामीण पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निवळी गावडेवाडी येथील किरण साळवी यांच्या आंबा बागेत धृवकुमार शाही याचे कुटुंबिय राखणीचे काम करतात .15 जानेवारी 2023 रोजी दुपारी 3 च्या सुमारास धृवकुमार यास अज्ञात इसमाने फुस लावून पळवून नेले, अशी तक्रार त्यांच्या पालकांच्या वतीने ग्रामीण पोलिसांत करण्यात आली आहे.धृवकुमार याने अंगात लाल रंगाचा फूल टी शर्ट, पायात निळ्या रंगाची पॅन्ट, पायामध्ये काळ्या रंगाचे चप्पल, डाव्या हातात पिवळया रंगाचे बँड आहे. तरी धृवकुमार याच्याबद्दल कुणाला काही माहिती असल्यास त्यांनी पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
Previous Articleपुणे जिल्ह्यातील नऊ गुन्हेगार एकाच वेळी तडीपार
Next Article जामसंडे मळई येथे १२ रोजी मत्स्य महोत्सव









