पोस्टमॉर्टम रिपोर्टनंतर मणिपूरमध्ये संचारबंदी
इम्फाळ- वृत्तसंस्था
कुकी समजातील दहशतवाद्यांनी ११ नोव्हेंबर रोजी हिंदू मतैई तीन महिला आणि तीन बालकांचे अपहरणकरून हत्या केली. यापैकी तीन मृतदेहांचे पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर मणिपूरमध्ये सर्वत्र संचारबंदी करण्यात आली आहे. यापैकी एक बालिकेचा हात तोडून तिच्या डोक्यात गोळी झाडून हत्या केल्याचेही पुढे आले. या बालिकेचा मेंदूचा भाग आणि उजवा डोळा गायब आहे. तिच्या शरीरावर अनेक चाकू खूपसण्याचे वार आहेत. वाईराणी देवी या महिलेवर पाच गोळ्या तर अन्य महिलेच्या शरीरावर तीन गोळ्या झाडण्यात आल्याचेही आढळले आहे. इम्फाळ खोरे, जिरीबाम यांसह पाच जिल्ह्यात शाळा आणि महाविद्यालये करण्यासंबंधी राज्यसरकारने आदेश दिले होते. पण आता या आदेशालाही स्थगिती देण्यात आली आहे.









