संशयितास चिखली कोलवाळ येथे अटक
प्रतिनिधी / म्हापसा
महाराष्ट्रा तोफखाना पोलीस स्थानकाला एक हवा असलेला एका मुलीचे अपहरण करून गोव्यात कोलवाळ येथे लपून बसलेल्या संशयित आरोपी युवराज सोनया कोटकर वय 23 रा. अहमदनगर याला कोलवाळ पोलीस स्थानकाचे निरीक्षक विजय राणे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक कुणाल नाईक, शिपाई संदीप मळीक यांनी पकडण्यास यश मिळविले.
संशयित आरोपी 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करून चिखली कोलवाळ येथे लपून बसला होता. त्या मुलीची पोलिसांनी सुटका केली व आरोपीला अहमदनगरचे उपनिरीक्षक बाळासाहेब शिंदे यांच्या स्वाधीन केले.









