वृत्तसंस्था/ बेसिल
विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या येथे सुरू असलेल्या स्वीस खुल्या सुपर 300 दर्जाच्या पुरुष आणि महिलांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत भारताचा पुरुष टेनिसपटू किदाम्बी श्रीकांतने एकेरीमध्ये उपांत्य फेरी गाठताना चीन तैपेईच्या ली चा पराभव केला.
2024 च्या बॅडमिंटन हंगामातील किदाम्बीची ही 8 वी स्पर्धा असून त्याने तब्बल 16 महिन्यानंतर आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत पहिल्यांदा पुरुष एकेरीची उपांत्य फेरी गाठली आहे. पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात श्रीकांतने चीन तैपेईच्या चिया हेओ ली याचा 35 मिनिटांच्या कालावधीत 21-10, 21-14 अशा सरळ गेम्समध्ये पराभव करत शेवटच्या चार खेळाडूत स्थान मिळवले. किदाम्बी श्रीकांतने यापूर्वी म्हणजे 2022 च्या नोव्हेंबर महिन्यात झालेल्या हायलो खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत उपांत्य फेरी गाठली होती. 2021 च्या विश्व बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेतील रोप्यपदक विजेता श्रीकांतचा उपांत्य फेरीचा सामना चीन तैपेईच्या 22 व्या मानांकित लीन चुन यी याच्याबरोबर होणार आहे. पुरुष एकेरीच्या अन्य एका सामन्यात डेन्मार्कच्या रेसमुस गिमेकीने भारताच्या किरण जॉर्जचा 21-23, 21-17, 21-15 असा पराभव केला. त्याचप्रमाणे अन्य एका सामन्यात चीन तैपेईच्या चेनने भारताच्या प्रियांशू राजवतचे आव्हान 21-15, 21-19 असे संपुष्टात आणले.









