सिद्धार्थ मल्होत्राने शेअर केली पहिली झलक
बॉलिवूडचे आणखी एक दांपत्य आता पॅरेंटिंग क्लबमध्ये सामील झाले आहे. सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणीने स्वत:च्या मुलीचे स्वागत केले आहे. कियाराने मुंबईतील एका रुग्णालयात मुलीला जन्म दिला आहे. मुलीच्या जन्माच्या काही तासांनी सिद्धार्थने सोशल मीडियावर पहिली पोस्ट केली आहे. पहिली झलक शेअर करत त्याने स्वत:च्या जीवनात कसे बदल झाले हे सांगितले आहे.
आमचा दिवस भावनांनी भरून गेला आहे, कारण आमचे जीवन आता पूर्णपणे बदलले आहे. आम्हाला मुलगी झाली आहे असे सिद्धार्थने स्वत:च्या पोस्टमध्ये नमूद केले आहे. या पोस्टनंतर सिद्धार्थ आणि कियाराचे अनेक कलाकारांनी अभिनंदन करत शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. सुनील ग्रोवर, नेहा धूपिया, सोफी चौधरी, हुमा कुरैशी, संजय कपूर, मुकेश छाबडा, मोनालिसा यांच्यासह अनेक कलाकारांनी दांपत्याचे अभिनंदन केले आहे. याचबरोबर सिद्धार्थ आणि कियाराच्या निकटवर्तीयांनी रुग्णालयात जात त्यांचे अभिनंदन केले असल्याचे समजते.









