मुंबई
अभिनेत्री कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांनी इन्स्टाग्रामवरून गुड न्यूज शेअर केली आहे. या दोघांनी हातात लहान मुलांचे सॉक्स धरलेला फोटो इन्स्टाग्रामवरून शेअर करत चिमुकल्याची चाहुल लागल्याचे चाहत्यांना सांगितले आहे. “आमच्या आयुष्यातील सर्वात सुंदर भेट लवकरच येत आहे”. अशी या पोस्टला कॅप्शनही दिली आहे.
या दोन्ही अभिनेत्यांच्य या पोस्टवर चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. अभिनेत्री हुमा खुरेशी ने, ओएमजी अभिनंदन अशी कमेंट केली आहे. तर अभिनेत्री नेहा धुपियाने पोस्टवर कमेंट करत अभिनंदन केले आहे.कियारा आणि सिद्धार्थ या दोघांनी २०२१ मध्ये शेरशाह या सिनेमासाठी एकत्र काम केले. त्यानंतर ७ फेब्रुवारी २०२३ रोजी या दोघांनी लग्नाची गाठ बांधली. त्यांचा विवाह सोहळा राजस्थानमधील जैसलमेल येथे पार पडला.









