नवी दिल्ली
दक्षिण कोरियातील दुसरी मोठी कार निर्मिती कंपनी किया मोटर्स आगामी काळात 501 किमीचे अंतर कापणाऱ्या इलेक्ट्रिक कार्स आणणार असल्याची माहिती आहे. एसयूव्ही गटात इव्ही 9 प्रकारात सदरच्या कार्स कंपनीकडून लाँच होणार असल्याचे सांगितले जाते.
99.8 किलो वॅटची बॅटरी गाडीत असणार असून एका चार्जनंतर कार 500 कि. मी.चे अंतर कापेल, असा दावा कंपनीने केला आहे. किया इव्ही 9 चे सादरीकरण युरोप व अमेरिका यासह इतर आंतरराष्ट्रीय बाजारात करणार आहे. 1 लाख कार्सचे उत्पादन कंपनी सेऊलमधील कारखान्यात करणार आहे. 2026 पर्यंत 10 लाख इलेक्ट्रिक कार्स विकण्याचा इरादा कंपनीचा असून 2027 पर्यंत 15 मॉडेल आणण्याची योजना कंपनीने आखली आहे.









