वृत्तसंस्था / लीमा (पेरु)
येथे सुरू असलेल्या आयएसएसएफ कनिष्ठांच्या विश्व नेमबाजी चॅम्पियनशीप स्पर्धेत महिलांच्या 50 मी. रायफल थ्री पोझीशन नेमबाजी प्रकारात खुशीने कास्यपदक पटकाविले.
खुशीने कास्यपदक मिळविल्याने या स्पर्धेत भारताची पदक संख्या 15 झाली आहे. भारताच्या 15 पदकांच्या कमाईमध्ये 10 सुवर्ण, 1 रौप्य आणि 4 कास्य पदकांचा समावेश असून सदर स्पर्धेच्या पदकतक्त्यात भारत पहिल्या स्थानावर आहे.









