तामिळनाडूतील भाजप नेत्या अन् अभिनेत्री
वृत्तसंस्था/ चेन्नई
राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्य म्हणून खुशबू सुंदर यांची नियुक्ती झाल्याची माहिती तामिळनाडू भाजपचे प्रमुख के. अन्नामलाई यांनी सोमवारी दिली आहे. खुशबू सुंदर यांनी महिला अधिकारांसाठी केलेल्या संघर्षामुळेच ही नियुक्ती करण्यात आली असल्याचे अन्नामलाई यांनी ट्विट करत म्हटले आहे. राष्ट्रीय महिला आयोग ही संसदेकडून 1990 मध्ये संमत अधिनियमाच्या अंतर्गत 31 जानेवारी 1992 मध्ये स्थापन एक घटनात्मक संस्था आहे. महिला आयोग तक्रार किंवा स्वतः दखल घेत महिलांसाठी कायदेशीर सुरक्षा उपाययोजना लागू करवितो. खुशबू या तामिळनाडतील भाजपच्या प्रमुख नेत्या आहेत. तसेच दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेत्री म्हणून त्यांना ओळखले जाते.









